कथा-अ


                      बोधकथा 

     एके दिवशी एका शेतकऱ्याचा घोडा शेतातल्या कोरड्या विहिरीत पडला, जखमी झाल्यामुळे तो मोठ्याने ओरडत होता.लोकं जमा झाले शेतकरी धावत आला त्याने बराच विचार केला फार प्रयत्न केले.
     त्या घोड्याला त्या विहीरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले,पण काही करता त्याला बाहेर काढणे जमत नव्हते.दिवस मावळायला आला होता.शेतकरीही आता थकला होता आणि कंटाळला होता त्याने विचार केला.आता हा घोडातर तसाही म्हातारा झाला आहे असेही निरुपयोगी आहे.आणि ती विहिरही कोरडीचं आहे .
     त्याला बाहेर काढण्या पेक्षा त्याला बुजून द्यावे... विहीरीत माती लोटावी...घोड्याचा प्रश्न ही सुटेल आणि शेतातली ही विहीरही बुजली जाईल.
      मग काय जमलेल्या सर्व लोकांकडून त्याने मदत मागीतली.आणि सगळे कामाला लागले,कुदळ फावड्यांनी माती टाकायला सुरुवात झाली.....मध्ये पडलेल्या त्या जखमी घोड्याला काही कळेनासे झाले ...विहीरीत पडल्याने शरीराला झालेल्या जखमांची वेदना आणि त्यात भर म्हणजे आयुष्यभर ज्या मालकाची चाकरी केली.त्याची ओझी वाहीली आज तोचं मालक जिवावर उठला...ते दुखा:ने अजून मोठयाने ओरडू लागला वरुन माती पडतचं होती...काही वेळाने घोड्याचा ओरडण्याचा आवाज थांबला.....सागळ्यांना वाटले घोडा मेला बहुतेक शेतकर्याने सहज विहीरीत डोकावून पाहीले,तर तो पहातचं राहीला...अंगावरची माती झटकत घोडा उभा राहीला होता.
लोकांनी अजून पटापटा माती टाकणे सुरु केले...परत पाहीले तर घोडा त्याचा तोच मग्न होता तो वरुन माती पडली की, झटकायचा आणि त्या पडलेल्या मातीच्या थरावर उभा रहायचा.....
      असं करता करता कोरडी विहीर बरीचं भरली आणि कठडा जवळ येताचं तो घोडा तो कठडा ओलांडून बाहेर आला....

     आयुष्यात वेगळे तरी काय होतं ?
आपण खड्यात पडलो तर, आपणास काढायला कोणीतरी एकचं येते पण आपल्यासाठी खड्डे खणणारे आणि खड्यात पडल्यावर माती लोटणारे आपल्याला गाडण्याचा प्रयत्न करणारे बरेचं भेटतात.
        म्हणून स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा ....आपले डोके नेहमी शांत ठेवा समस्या कीतीही मोठी असो....शांत मनाने ती हाताळा.... खड्ड्यात,पडलो आणि कोणी पाडलं ह्या बद्द्ल दुखः करण्यापेक्षा,त्यातून बाहेर कसे पडायचे हा विचार करा.....
      झटका ती माती आणि त्या मातीची एक एक पायरी करत... हळूहळू यश प्राप्ती करीता वर या.

----------------------------------------------------------

                 बोधकथा

        एकदा कुत्र्यात अन गाढवात
पैज लागते कि,जो पण लवकरात लवकर पळत जाऊन गावं पलीकडच्या सिंहासनावर बसेन. तोच त्या सिंहासनाचा मानकरी ठरेन. ठरल्या प्रमाणे दोघे तयार झाले ,
कुत्र्याला वाटले मीच जिंकेन .
कारण गाढव पेक्षा मी जोरात धावू शकतो,पण कुत्र्याला पुढे काय होणार ते नक्की माहिती नव्हते .
शर्यत सुरु झाली. कुत्रा जोरात धाऊ लागला.
पण थोडस पुढ गेला नसेल कि लगेच पुढच्या गल्लीतील कुत्र्यांनी त्याला हुसकून लावयला सुरवात केली ,
असाच प्रत्येक गल्लीत , प्रत्येक चौकात , घडत राहिले.
   कसा बसा कुत्रा धावत धावत सिंहासनाजवळ पोहचला
तर बघतो , तर काय गाढव त्या आधीच पोहचले होते.
अनं त्याने शर्यत जिंकून ते राजा झाले होते.
       अन ते बघून निराश झालेला कुत्रा बोलला कि
जर माझ्याच लोकांनी मला मागे ओढले नसते तर आज
 गाढव सिंहासनावर बसले नसते.

             तात्पर्य काय
१.आपल्याना विश्वासात घ्या.
२.आपल्याना पुढे जाण्यास सहकार्य करा,त्याना प्रोत्साहन द्या.
३.नाहीतर उद्या बाहेरची गाढवं आपल्यावर राज्य करतील
४. नक्की विचार आणि आत्मपरिक्षण करा.
          आपली माणसं मोठी करा. 

-----------------------------------------------------------

                        बोधकथा
     एका राजाला जीवनाविषयी अपार कुतूहल होते.त्याच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक साधू, संत, फकिराला तो विचारत असे की मला एक असा छोटा मंत्र द्या की तो अगदी कुठल्याही क्षणाला मला उपयोगी पडेल.मला कायम आनंदी ठेवेल.
अखेर एका बौद्ध भिक्षुने त्याला एक अंगठी दिली व सांगितले की यातील डबीत एका कागदावर मंत्र लिहिलेला आहे,पण जेव्हा जीवन-मरण असा प्रश्न तुझ्यापुढे उभा राहील तेव्हाच डबी उघड, तेव्हाच मंत्र कामाला येईल.बरीच वर्षे शांत गेल्यावर राजाचे दिवस फिरले.राज्यात बंडाळी झाली व त्याच्याच कपटी प्रधानाने त्याला तुरुंगात टाकले.पहाटेला फाशी द्यायचे ठरले.विश्वासू सेवकाने राजाला रात्री सोडवून, एक घोडा बरोबर दिला.मजल दरमजल करीत राजा सीमेपासून दूर पळाला.कळाल्यावर दुष्ट  प्रधानाने सैनिकांची तुकडी राजाच्या मागावर पाठवली.राजा एका डोंगराच्या शिखरापर्यंत पोहोचला.पुढे दरी होती.घोड्याला चरायला सोडून, मोठ्या खडकाआड लपला. त्याला वाटले आता थोडया वेळात सैनिक गाठणार व आपण मरणार.  त्या क्षणी त्याला त्या अंगठीची आठवण आली.ती त्याने उघडली.त्यात एकच वाक्य लिहिले होते,

"This too shall pass "
 म्हणजे
"हाही क्षण निघून जाईल"

केवळ ते वाक्य वाचून राजाचे मन शांत झाले.आश्चर्य घडले.सैनिक तेथपर्यंत पोहचले.त्यांना वाटले फक्त घोडा दिसतोय म्हणजे राजा दरीत पडून मेला. ते परतले.राजाने शेजारच्या राज्याची मदत घेऊन काही दिवसांत आपले राज्य परत मिळवले. विश्वासघातकी प्रधानाचा शिरच्छेद केला.  विजयाचा जंगी समारंभ चालू असताना, नवीन प्रधानाने पाहिले की महाराज कुठेही अति-उत्साहित न होता प्रशांत मुद्रेने सिंहासनावर विराजमान आहेत.त्याने अदबीने विचारले,
" महाराज, आपल्या आयुष्यात एवढ्या भयानक घडामोडी घडल्या व त्यातून आपण सहीसलामत बाहेर पडला, तेव्हा आपण आज आनंदाने ओसंडून जायला हवे." राजा म्हणाला, " नाही, आता मला बुद्धाचा अनित्यता वादाचा अर्थ व सामर्थ्य कळले आहे. जगात कुठलीही गोष्ट कायमची टिकून राहत नाही.परिवर्तन जगाचा शाश्वत नियम आहे.या जगात सुख ही राहात नाही, दुःखही राहात नाही.हे मला आता समजलेले आहे.म्हणून दुःखात खचू नये, सुखात नाचू नये."

This too shall pass !
हे क्षणही निघून जातील.
ही बोधकथा आपल्याला जगायला शिकवेल.नुसतेच जगायला नव्हे तर प्रत्येक प्रसंगात मनाची शांती अबाधित ठेवण्याची, मन स्थिर ठेवण्याची गुरुकिल्लीच इथे दिलेली आहे.


आणखी काही बोधकथा