विचारधारा

     बाबासाहेब यांचे विचार
१) सन्मार्गावर चालत असतांना सहचारी नसला,
       तरी एकट्याने मार्गक्रमण करत राहावे.
२) जो तृष्णेचा क्षय करण्यात सदैव रत  असतो,
      तोच सम्यक संबुद्धाचा खरा शिष्य शोभतो.
३) बुद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करणे ,
       हेच खरे समाजकार्य होय.
४) मानवाचे दुराचारी मन हे
     अणूबॉम्ब पेक्षाही घातक ठरू शकते.
५) भविष्य घडविण्यासाठी आपण वर्तमानातील
     सुखाचा व गरजांचा त्याग केला पाहिजे.
६) जेथे एकता , तेथे सुरक्षितता
७) माणसाने खावे जगण्यासाठी ,
      पण जगावे समाजासाठी.
८) मोठमोठ्या गोष्टीचे केवळ बेत आखण्यापेक्षा
    छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधिक श्रेष्ठ होय.
९) जीवनातील खरे भांडवल म्हणजे वेळ होय,
     वेळकाडूपणा प्रगतीची सर्व दारे बंद करतात.
१०) वेळ कधी विकत किंवा उसनवार मिळत नाही, 
      म्हणूनच वेळेचा सद्उपयोग करावा. 
११) खरा देशभक्त तोच जो समता,स्वातंत्र्य, आणि 
      बंधुतामूलक समाजासाठी कार्य करतो.
१२) शिकलेली माणसे हि केवळ पोटभरू असून भागणार 
   नाही. त्यांच्या शिक्षणाचा इतरांना फायदा झालाच पाहिजे.  
१३) कोणत्याही समाजाचे खरे सामर्थ्य हे त्यांच्या एकजुटीत
       किंवा संघटनेत सामावलेले असते.
१४) इतरांच्या सुखदुःखात सहभागी होणे
         म्हणजेच बंधुता होय.
१५) मानसाचे दुःख हे त्याच्या अनुचित व्यवहाराचा
       परिणाम आहे.
१६) दैवी चमत्कार ,आत्मा व ईश्वर यावरील विश्वास ठेवणे
        म्हणजे अधर्म होय.
१७) जो आपली बुद्धी जागृत ठेवून आपले हक्क व
        कर्तव्याप्रती सदैव जागृत असतो तो स्वतंत्र होय.
१८) जो समाज आपला इतिहास विसरतो ,
        तो समाज इतिहास निर्माण करु शकत नाही.
१९) शिकलेल्या लोकांमध्ये जर शील नसेल तर
        समाजाचा व देशाचा नाश होईल.
२०) अथक परिश्रमाशिवाय या जगात 
        कुणाला काहीही मिळत नाही.
२१) तुमच्याबद्दल इतरांना आदर वाटेल मान सन्मान वाटेल
       अशीच कृती तुम्ही केली पाहीजे.
२२) अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रथमतः आपण  
      आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व स्वाभीमानी बनले पाहिजे
२३) ज्याप्रमाणे मनुष्यास अन्नाची गरज असते
      त्याचप्रमाणे मनास ज्ञानाची (शिक्षणाची)गरज असते.(बु.)
२४) मनाची मलीनता दुर करणे म्हणजे धम्म होय.
       निती म्हणजे धम्म होय.
२५) विद्या,प्रज्ञा,शील,करुणा आणि मैत्री या पंचतत्वानुसार
       प्रत्येकाने चालले पाहीजे.
२६) मुर्खाच्या संगतीपासून दुर राहणे आणि सज्जनाची 
        संगती धरणे हे उत्तम मंगल होय.
२७) पुष्कळ विद्या शिकणे, कला शिकणे, सदवर्तनाची
        सवय लावणे आणि समयोचित भाषण करणे
        हे उत्तम मंगल होय.
२८) आदर,नम्रता,संतुष्टी,कृतज्ञता आणि वेळोवेळी धम्मश्रवण
       करणे उत्तम मंगल होय.
२९) गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करुन द्या.
        म्हणजे तो बंड करुन उठेल.
३०) केवळ माझा जयजयकार करण्यापेक्षा माझ्या दृष्टीने
        जे उचित कार्य आहे ते सदैव करा.
३१) तथागत म्हणजे -- बोलल्याप्रमाणे चालणारा
       भगवान म्हणजे -- तृष्णेचा नाश करणारा 
       अरहंत म्हणजे -- अस्तीत्वावर विश्वास ठेवणारा
       सम्यक संबुद्ध म्हणजे -- जागृत व परिपूर्ण असणारा
३२) स्वातंत्र्य म्हणजे इतरांच्या हितसंबंधाला बाधा न आणता
      हिंसा न करता आपली उपजीविका साध्य करणे होय
३३) निःस्वार्थ प्रेमाची भावना म्हणजे मैत्री होय. मैत्री ही
       सागराप्रमाणे व आकाशाप्रमाणे अफाट आहे.(बु.)
३४) खराखुरा धर्म हा शास्त्रात नसून माणसाच्या मनात 
        असतो. (बु.)
३५) तुम्ही खरं लिहायला किंवा बोलायला भीत असाल,
तर समजून जा की तुम्ही गुलामगिरीकडे वळत आहात.                                - डॉ.बाबासाहेब आंबेडकर