कथा - ब

     
               पंचशीलाचे महत्त्व

पंचशीलाबाबत एक गोष्ट अशी आहे की,एकदा एक भिक्खु एका गांवावरुन दुसर्या गावाला जात असतांना रात्र होते.
म्हणून ते त्या गांवच्या शेवटच्या घरातील गृहस्थाला निवा-याची व्यवस्था करायाला विनंती करतात.तेव्हा तो गृहस्थ आनंदीत होऊन भिक्खुंची राहण्याची व्यवस्था करतात.
       सकाळी उठून भिक्खु त्या गृहस्थाला पंचशीलाचे पालन केल्यामूळे तुझे कल्याण होईल असे सांगतात.
परंतू त्या गृहस्थाचा व्यवसाय चोरी करण्याचा असल्यामूळे तो मनातल्या मनात विचार करतो की, हे शील पाळणे मला शक्य होणार नाही.म्हणून जस-जसे भिक्खु एक-एक शील समजावून सांगतात तस-तसे तो गृहस्थ शीलाचे पालन करण्यास नकार देतो.त्या गृहस्थाचा व्यवसाय चोरी करण्याचा आहे हे सुध्दा तो गृहस्थ भिक्खूला सांगू शकत नाही.
म्हणून भिक्खु म्हणतात की, पांचही शीले पाळता येत नसतील तर निदान चार शीले तरी पाळा.
तो गृहस्थ त्यालाही नकार देतो.
तेव्हा भिक्खु म्हणतात की, निदान तीन शीले तरी पाळा.
तो गृहस्थ त्यालाही नकार देतो. तेव्हा भिक्खु म्हणतात की,
निदान दोन शीले तरी पाळा.
तो गृहस्थ त्यालाही नकार देतो. तेव्हा भिक्खु म्हणतात की,
निदान एक शील तरी पाळा.
गृहस्थाला वाटते की, एखादा शील तरी पाळायला काय हरकत आहे, म्हणून तो गृहस्थ भिक्खूला म्हणतो, “मी खोटे बोलणार नाही, हे शील पाळायला तयार आहे.”
भिक्खु उपदेश करुन निघून जातात.
रात्रीला नेहमीप्रमाणे तो गृहस्थ चोरी करायला बाहेर पडतो. त्याचवेळेस त्या राज्याचा राजा सुध्दा वेशांतर करुन राजवाडयाच्या बाहेर येतो. तेव्हा त्या राजाला तो गृहस्थ दिसतो.त्या गृहस्थाला राजा विचारतो, “कोण आहेस ?
काय करतो ?”त्या गृहस्थाने खरे बोलण्याची प्रतिज्ञा घेतल्यामूळे त्याने सांगितले,
“मी चोर आहे. राजाच्या तिजोरितील हिरे मला चोरायचे आहे.”तेव्हा त्या राजाला त्याच्या खरे बोलण्याबद्दल कौतूक वाटले.राजाने त्याला सांगितले,
“ तू तर खरा बोललास. मी जर हे राजाला सांगितले तर ते तुला शिक्षा करतील. म्हणून तू जे हिरे चोरशील त्यापैकी मला अर्धे दे. म्हणजे मी राजाला सांगणार नाही.”
या गोष्टीला तो चोर तयार झाला.
तो राजवाडयाच्या आंत जाऊन हिर्याचा शोध घेतो. तेव्हा त्याला असे दिसले की,
त्या तिजोरीत फक्त तिनच हिरे आहेत.
यापैकी अर्धे हिरे बाहेरच्या व्यक्तीला कसे देणार असा प्रश्न पडल्यामूळे तो एक हिरा तसाच ठेऊन दोन हिरे सोबत घेऊन राजवाडयाबाहेर पडतो.
बाहेरच्या व्यक्तीला त्या दोन पैकी एक हिरा देतो.त्या व्यक्तीने विचारल्यामूळे पत्ता सांगून तो चोर निघून जातो.
दुसर्या दिवशी राजा प्रधानाला तिजोरीची पाहणी करायला सांगतात.तिजोरी पाहील्यानंतर प्रधानाला तिन पैकी फक्त दोन हिरे चोरीला गेल्याचे आढळते.
प्रधानाला वाटते की, चोराने तिन्हिही हिरे चोरले असते. राजाला कुठे माहिती आहे की,
एक हिरा चोराने तेथेच ठेऊन दोन हिरे घेऊन गेला.
म्हणून तो एक हिरा स्वत:जवळ ठेवतो व राजाला सांगतो की, तिजोरितील तिन्हिही हिरे चोरीला गेले आहेत.
राजाला त्या प्रधानाचा खोटेपणा व चोराचा खरेपणा लक्षात आला. त्याचवेळेस राजा दरबार भरवतो. हिरे चोरणार्या त्या चोराला राजा दरबारात बोलावीतो.
चोराच्या लक्षात येते की, रात्रीचा जो व्यक्ती होता तो राजा आहे. आपण त्याला खरे सांगितल्यामूळे राजा आता आपल्याला निश्चितच शिक्षा करणार...
आपण भिक्खुमूळे फसल्या गेलो याचे त्याला दु:ख झाले.
राजाने प्रधानाने केलेल्या खोटेपणा बद्दल प्रधानाला काढून टाकले व चोराच्या ख-यापणाबद्दल त्या चोराला प्रधान बनवीले.
राजाचा हा निर्णय पाहून चोराला आश्चर्य वाटले.
भिक्खूने सांगितलेल्या एका शीलाचे पालन केल्यामूळे मला प्रधानपद मिळते.
मी जर पांचही शीलाचे पालन केले असते तर मी कुठल्या कुठे जाऊन पोहचलो असतो.
एवढी ताकद या पंचशीला मध्ये आहे याची त्याला जाणीव झाली.....!!!
                                 नमो बुद्धाय ।

-------------------------------------------------------------------
   
            ⚜ *बोधकथा*⚜
                  दर्पण 
      एक गुरूंच्‍या घरी एक शिष्‍य मनोभावे गुरुंची सेवा करून शिक्षण घेत होता. त्‍याच्‍या या सेवेमुळे गुरु त्‍याच्‍यावर प्रसन्न होते. शिक्षण् पूर्ण झाल्‍यावर विद्यार्थी घरी जाण्‍यासाठी निघाला तेव्‍हा गुरुंकडे त्‍याने जाण्‍याची आज्ञा मागितली तेव्‍हा गुरुंनी त्‍याला आशीर्वाद म्‍हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की, हा दिव्‍य आरसा (दर्पण) असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रगट होऊन दिसतात. विद्यार्थी मोठा आनंदीत झाला. हा आरसा खरेच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्‍यासाठी त्‍याने लगेच आपल्‍या गुरुंसमोर हा आरसा धरला व गुरुंच्‍या मनात कोणते भाव आहेत, दुर्गुण आहेत हे पाहू लागला आणि गुरुंच्‍या समोर आरसा धरताच त्‍याच्‍या चेह-यावरचा रंग पार उडाला कारण तो आरसा गुरुंच्‍या अंतकरणात मोह, अहंकार, क्रोध आदि विकार दाखवित होता. त्‍याला याचे फारच दु:ख झाले की आपण ज्‍या गुरुची मनोभावे पूजा केली, ज्‍यांना पूर्ण ईश्र्वराचा दर्जा दिला त्‍यांच्‍या मनातही विकार आहेत, ते सुद्धा मानवी विकारापासून अजून सुटलेले नाहीत याचे त्‍याला वैषम्‍य वाटले. तो गुरुंना काहीच न बोलता तो आरसा घेवून गुरुकुलातून निघाला, रस्‍त्‍यात भेटणा-या प्रत्‍येकाच्‍या मनातील भाव पाहणे हे त्‍याचे कामच झाले होते. गावी परत जाताच त्‍याने आपल्‍या प्रत्‍येक परिचिताबरोबर हा प्रयोग करून पाहिला. त्‍याला प्रत्‍येकाच्‍या हृदयात कोणता ना कोणता दुर्गुण दिसून आला. शेवट त्‍याने आपल्‍या जन्‍मदात्‍या आई वडीलांच्‍या समोरही हा आरसा ठेवला. ते दोघेही पण त्‍यातून सुटले नाहीत. त्‍यांच्‍या हृदयात पण त्‍याला काही ना काही दुर्गुण दिसले. शेवटी या गोष्‍टीचा त्‍याला मनोमन राग आला व तो गुरुकुलातील गुरुंकडे धावला. गुरुंपाशी जाऊन मोठ्या विनम्रपणे तो म्‍हणाला,’’ गुरुदेव, मी आपण दिलेल्‍या या आरशातून प्रत्‍येकाच्‍या मनात, हृदयात, अंत:करणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्‍येकाच्‍याच मनात काही ना काही विकार आहेच, काही ना काही दोष आहे. एखाद्याच्‍या मनात कमी तर कुणाच्‍या मनात जास्‍त असे विकार, दोष भरून राहिले आहेत. हे पाहून मी फार दु:खी झालो आहे, कृपया मला मार्गदर्शन करा.’’ गुरुंनी काहीच न बोलता तो आरसा फक्त त्‍याच्‍याकडे केला आणि काय आश्र्चर्य त्‍याला त्‍याच्‍या मनाच्‍या प्रत्‍येक कोप-यात राग, द्वेष, अहंकार, क्रोध, माया आदि दुर्गुण भरून राहिलेले दिसले. गुरुजी म्‍हणाले,’’ वत्‍सा, हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्‍यासाठी दिला होता पण तू दुस-यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास, अरे याच कालात जर तू जर स्‍वत:चे अवलोकन केले असते तर तुला तुझ्यातील दुर्गुण सुधारता आले असते. याच काळात तु एक असामान्‍य व्‍यक्ती झाला असता. मानवाची ही कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुस-यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्‍वत:ला सुधारण्‍याचा प्रयत्‍नही करत नाही. हेच या आरशातून मला तुला शिकवायचे होते. जे तुला शिकता आले नाही.’’*

*तात्‍पर्य – आपण नेहमीच दुस-या व्‍यक्तीचे दुर्गुण बघतो, त्‍यावर टीका करतो पण आपल्‍यातील दुर्गुणांवर आपले कधीच लक्ष जात नाही.

          
                    
                        बोधकथा 
   एकदा एका उंदराने हिरा गिळला. हिऱ्याच्या मालकाने त्या उंदिराला मारण्यासाठी एका शिकाऱ्याला कंत्राट दिले. 
शिकारी जेव्हा त्या उंदिराला मारण्यास पोहचला तेव्हा सगळे उंदिर एक घोळका करून दाटीवाटीने बसले होते, पण एक उंदिर त्यांच्यापासून वेगळा बसला होता.
शिकाऱ्याने सरळ जाऊन त्या वेगळ्या बसलेल्या त्याच उंदिराला पकडले ज्याने हिरा गिळला होता.
हिरामालक आश्चर्यचकित झाला त्याने शिकाऱ्यास विचारले, तुम्ही हजारो उंदरातून ज्याने हिरा गिळलाय त्याच उंदराला कसे काय ओळखले ?

शिकाऱ्याने उत्तर दिले खूप सोपं काम होत, जेव्हा मूर्ख धनवान बनतो तेव्हा तो इतरांशी संपर्क तोडतो..!


तात्पर्य -
आयुष्यात धन, दौलत, ऐश्वर्य, संपत्ती,नाव आणि सगळं काही कमवा पण आपण ज्या समाजात वाढलो, जगलो, मोठे झालो, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. आपण ह्या समाजामुळेच मोठे झालो हे कधीच विसरू नका.. नाहीतर त्या मूर्ख उंदिरामध्ये आणि आपल्यात काहीच फरक उरणार नाही..!
            
माणसे जोडा🙏🏻मानवता हाच धर्म