बोधकथा



 01.  ★बेडूक आणि उंदीर★

                    
   एक उंदीर आणि एक बेडुक एकमेकांचे मित्र होते.बेडूक 
उंदराच्या घरी जाऊन वारंवार पाहुणचार घेत असे. त्याने 
उंदरालाही आपल्या घरी येण्याचा आग्रह केला. परंतु वाटेत 
पाणी असल्याने 'मी येऊ शकत नाही,' असे सांगून उंदीर ते 
टाळीत असे. परंतु एकदा बेडकाने खूपच आग्रह केला व 
त्याचा एक पाय आपल्या एका पायाला बांधून पाण्यातून 
निघाले.
      वाटेत बेडकाच्या मनात आलं की, उंदराला पाण्यात 
बुडवून टाकले म्हणजे त्याच्या बिळातले सर्व अन्न आपल्याला 
मिळू शकेल म्हणून त्याने पाण्याच्या तळाशी बुडी मारली. 
तेव्हा उंदीर जोरजोरात ओरडून धडपड करू लागला. त्याचा 
आवाज ऐकून, आकाशातली एक घार खाली आली आणि
 उंदराला तोंडात धरून उंच उडाली. उंदराच्या पायाला 
बेडकाचा पाय बांधला असल्यामुळे तोही पकडला गेला. 
घारीने उंदराबरोबर त्यालाही खाऊन टाकले.

      * तात्पर्य *
*विश्वासघात करणार्‍या माणसाला
प्रायश्चित्त हे मिळतेच*.

   02.     *  कुत्रा व सुसर *   
  
   *इजिप्तमध्ये नाईल नावाची मोठी* नदी आहे. त्या नदीत
 खूप सुसरी आहेत. एके दिवशी एक तहानेला कुत्रा त्या 
नदीजवळ पाणी पिण्यासाठी आला. तो कुत्रा नदीतील 
पाणी जेथे थोडे, तेथे थोडे असे पिऊ लागला.  कुत्र्याचे 
असे पाणी पिणे पाहून त्या पाण्यातील एक सुसर आपले
 डोके पाण्यावर  काढून त्याला म्हणाली, 'अरे, तुला फार 
घाई झाली आहे का ? तू एका जागी उभा राहून पाणी का 
पीत नाहीस ? तुझी ओळख करून घ्यावी अशी माझी फार 
दिवसांची इच्छा पुरी होत आहे. तुझ्या ओळखीने मला फार 
आनंद होतो आहे.'
          सुसरीचे हे बोलणे ऐकल्यावर कुत्र्याने सुसरीला 
उत्तर दिले, 'तुझ्या मैत्रीबद्दल मी तुझे आभार मानतो. पण 
खरंच बोलायचं  झालं तर मी असा जो घाईघाईने पाणी 
पितोय तो तुझ्या सारख्यांची मैत्री होऊ नये म्हणूनच.

      * तात्पर्य *
   वाईट स्वभाव असलेल्याशी आपला
संबंध न यावा याबद्दल प्रत्येकाने जेवढी
खबरदारी घ्यावी तेवढी थोडीच आहे.

  03.  💢 *मुंगी व कबुतर* 💢
    
   एका मुंगीला खुप तहान लागली म्हणून ती नदीच्या 
काठावर पाणी पिण्यासाठी गेली. तेंव्हा तिचा पाय 
घसरला व ती पाण्यात पडली. ते जवळचे झाडावर 
बसलेल्या कबुतरांने पाहिले बुडणा-या मुंगीची त्याला 
दया आली. पटकन त्यांने झाडाचे एक सुकलेले पानं
 मुंगीजवळ फेकले. 
          मुंगी पानावर चढली आणि सुरक्षितपणे ती 
काठावर पोहोचली. तेवढ्यात तेथे एक फासेपारधी 
कबुतराला जाळे फेकणार एवढ्या मुंगी फासे
पारध्याच्या पायाला चावली. त्यामुळे तो जोरात 
ओरडला. कबुतर त्यामुळे सावध झाले व फासे
पारध्याला पाहून पळून गेले.अशा प्रकारे 
कबुतराच्या सत्कर्माचे फळं त्याला लगेच मिळाले 
व त्याचे प्राण वाचले.

         * तात्पर्य *
  संकटकाळी मदत करणारे हेच 
खरे मिञ.

04. 💢 *वानर व कोल्हा* 💢
    
   एकदा एक वानर व कोल्हा यांची अरण्यात गाठ 
पडली तेव्हा वानर कोल्ह्याला म्हणाला,
 'अरे, तुझ्या झुपकेदार शेपटाचा काही भाग तू मला 
देशील तर तो मी लावून वार्‍यापासून माझं रक्षण
 करीन. तुझे शेपूट तुला पुरून उरण्यासारख आहे.
 नाही तरी तू ते धुळीत मळवतोस. तर त्यातलं थोडं 
मला दिलस तर तुझी फारशी अडचण होणार नाही 
अन् माझंही काम होईल.
      हे ऐकून कोल्हा म्हणाला, 'अरे वानरा, 
तू म्हणतोस 
त्याप्रमाणे माझं शेपूट कदाचित मोठं असलं, तरी ते 
मी जन्मभर असंच धुळीत मळवीन पण त्यातला एक
 केसही तुला देणार नाही.'
   
* तात्पर्य *
    काही माणसांजवळ बरेच ऐश्वर्य
 असते पण ते स्वतः त्याचा उपयोग
 घेण्यास समर्थ नसतात, पण त्यांचा 
स्वभाव मात्र विलक्षण असतो की, 
त्या ऐश्वर्याचा ते नाश होऊ देतील पण 
दुसर्‍याला कधीही देणार नाहीत.

                   
                    5  बोध कथा 

       एके दिवशी एका शेतकऱ्याचा घोडा शेतातल्या कोरड्या विहिरीत पडला, जखमी झाल्यामुळे तो मोठ्याने ओरडत होता.लोकं जमा झाले शेतकरी धावत आला त्याने बराच विचार केला फार प्रयत्न केले.
     त्या घोड्याला त्या विहीरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले,पण काही करता त्याला बाहेर काढणे जमत नव्हते.दिवस मावळायला आला होता.शेतकरीही आता थकला होता आणि कंटाळला होता त्याने विचार केला.आता हा घोडातर तसाही म्हातारा झाला आहे असेही निरुपयोगी आहे.आणि ती विहिरही कोरडीचं आहे .
         त्याला बाहेर काढण्या पेक्षा त्याला बुजून द्यावे. विहीरीत माती लोटावी...घोड्याचा प्रश्न ही सुटेल आणि शेतातली ही विहीरही बुजली जाईल.
      मग काय जमलेल्या सर्व लोकांकडून त्याने मदत मागीतली.आणि सगळे कामाला लागले,कुदळ फावड्यांनी माती टाकायला सुरुवात झाली.....मध्ये पडलेल्या त्या जखमी घोड्याला काही कळेनासे झाले ...विहीरीत पडल्याने शरीराला झालेल्या जखमांची वेदना आणि त्यात भर म्हणजे आयुष्यभर ज्या मालकाची चाकरी केली.त्याची ओझी वाहीली आज तोचं मालक जिवावर उठला...ते दुखा:ने अजून मोठयाने ओरडू लागला  वरुन माती पडतचं  होती...काही वेळाने घोड्याचा ओरडण्याचा आवाज थांबला.....सागळ्यांना वाटले घोडा मेला बहुतेक शेतकर्याने सहज विहीरीत डोकावून पाहीले,तर तो पहातचं राहीला...अंगावरची माती झटकत घोडा उभा राहीला होता.
लोकांनी अजून पटापटा माती टाकणे सुरु केले...परत पाहीले तर घोडा त्याचा तोच मग्न होता तो वरुन माती पडली की, झटकायचा आणि त्या पडलेल्या मातीच्या थरावर उभा रहायचा.
      असं करता करता कोरडी विहीर बरीचं भरली आणि कठडा जवळ येताचं तो घोडा तो कठडा ओलांडून बाहेर आला.

     आयुष्यात वेगळे तरी काय होतं ?
आपण खड्यात पडलो तर, आपणास काढायला कोणीतरी एकचं येते पण आपल्यासाठी खड्डे खणणारे आणि खड्यात पडल्यावर माती लोटणारे आपल्याला गाडण्याचा प्रयत्न करणारे बरेचं भेटतात.
      म्हणून स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा ..आपले डोके नेहमी शांत ठेवा समस्या कीतीही मोठी असो....शांत मनाने ती हाताळा.... खड्ड्यात,पडलो आणि कोणी पाडलं ह्या बद्द्ल दुखः करण्यापेक्षा,त्यातून बाहेर कसे पडायचे हा विचार करा..
      झटका ती माती आणि त्या मातीची एक एक पायरी करत... हळूहळू यश प्राप्ती करीता वर या.
   

         


                      06  राजाचा महल

एका राजा ने अतिशय सुंदर ''महाल'' बनवला आणि महालाच्या मुख्य द्वारावर एक ''गणिताचे सूत्र'' लिहीले आणि घोषणा केली की या सूत्रानुसार हा महाद्वार जो कोणी उघडेल त्याला मी माझा उत्तराधीकारी घोषित करेन ! कारण राजा निपुत्रीक होता व त्याला राज्य अश्या व्यक्तीकडे द्यायचे होते कि ती व्यक्ती अतिशय चाणाक्ष असावी ! घोषणा ऐकून
राज्यातले मोठे मोठे गणितज्ञ आले आणि सूत्र पाहुन निघून गेले कारण असं सुत्र त्यांनी आयुष्यात पाहिल नव्हतं ? मुदतीचा शेवटचा दिवस आला त्या दिवशी ३ लोक आले आणि म्हणाले आम्ही हे सूत्र सोडवायचा प्रयत्न करू त्यामधील २ जण दुसऱ्या राज्यातील मोठे गणितज्ञ होते आणि एक त्याच राज्यातील अतिशय गरीब पण हुशार असा शेतकरी होता. गणितज्ञानी वेगवेगळी सुत्रे वापरून पाहिली पण दरवाजा उघडु शकले नाही ? सर्व लोक हैराण झाले कि जिथे एवढे मोठे गणितज्ञ हरले तिथे हा शेतकरी काय करील बिचारा साधासुधा माणुस? शेवटी त्याला सांगण्यात आल की चला तुमची वेळ आली आहे ! शेतकऱ्याने सहज स्मित केलं दरवाजाकडे गेला सूत्र वाचलं पण त्याला काय कळणार ?? शेवटी त्याने चाणाक्षपणे दरवाजा न्याहळुन त्याला मागे ढकलले !! आणि काय आश्चर्य दरवाजा सहज उघडला ? सर्व हैराण झाले आणि त्याच्या नावाचा जयजयकार केला !! नंतर त्याचा सन्मान करुन राजाने सहज विचारलं की आपण काय सूत्र वापरून दरवाजा उघडला ?? तो शेतकरी नम्रपणे म्हणाला की मी विचार केला कि गेले सहा दिवस एवढे मोठे विद्वान सुत्रं वापरतात पण दरवाजा उघडत नाही मग सुत्रच खोटे असावे आणि दरवाजा पाहिला तर त्याला कडीकुलुप पण दिसत नाही ? मी ठरवलच होतं की समस्या काय हे पहिले बघू नंतर ती कशी सोडवायची ते ठरवु आणि मी तेच केल.

कित्येकवेळा जीवनात ''समस्या'' ही नसतेच पण आम्ही त्या विचारांनीच अर्धमेले होतो की ती कशी सुटेल आणि चिंता करताना ती समस्या विनाकारण अतिशय जटील बनते.

जीवन दुःखी होण्याच हेच मोठं कारण आहे की आम्ही नको तिकडे जास्त लक्ष देतो !

🙏🙏