उपक्रम जाहिरात

"ऊठ मुला जागा हो.विचारधारेचा धागा हो"
सर्वांना  माहिती करिता
प्रति.
सन्मा.---------------------( धाम. रेल्वे)

आपणास कळविण्यात येते की, मागील वर्षी मिळालेला मुलांचा प्रतिसाद व उपक्रमाची फलश्रृती पाहता  यावर्षी सुद्धा १४ एप्रिल - डाॕ.बाबासाहेब आंबेडकर  जयंती निमित्ताने "विचारधारा " व "धम्मसंघटना " पृथ्वीराज नगर धाम.रेल्वे. व्दारा सलग  पाचव्या वर्षी सुध्दा शब्दकोडे स्पर्धा घेण्यात येत आहे.
 (शब्दकोडे स्पर्धा दिनांक 14 एप्रिल सकाळी ११ वाजता स्थळ - मैत्रेय बुद्ध विहार पृथ्वीराज नगर)

तसेच पुढील नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.
उपक्रमाचे नाव

१) * त्रिसरण पंचशिल सुस्वर पठन *

वर्ग १ ते ७ वी पर्यंत शिकत असणारे म्हणजे वयोगट ६ ते १४ मधिल मुले मुली यात सहभागी होऊ शकतील. ही स्पर्धा नसून उपक्रम आहे. त्यामुळे योग्य प्रकारे त्रिसरण पंचशिल म्हणता येणाऱ्या सर्वच सहभागी मुला-मुलींना बक्षिस वितरण करण्यात येईल. ( मागील वर्षीच्या प्रमाणपत्रधारक मुला-मुलींना या उपक्रमात सहभागी होता येणार नाही. त्यांना पुढील उपक्रम २ मध्ये सहभागी होता येईल.)

२) * त्रिसरण पंचशील व बुद्धवंदना सुस्वर पठन *
३) * त्रिसरण पंचशील , बुद्धवंदना  व  धम्मवंदना सुस्वर पठान *
४) * त्रिसरण पंचशील , बुद्धवंदना  ,धम्मवंदना व संघवंदना सुस्वर पठन *

मागील वर्षीच्या प्रमाणपत्रधारक मुला-मुलींना या उपक्रमात सहभागी होता येईल.  तसेच प्रथमताच नव्याने सहभागी होणारे वयोगट ६ ते १५ मधिल  मुले मुली यात सहभागी होऊ शकतील. ही स्पर्धा नसून उपक्रम आहे. त्यामुळे योग्य प्रकारे म्हणता येणाऱ्या सर्वच सहभागी मुला-मुलींना बक्षिस वितरण करण्यात येईल.

उपक्रमाचे स्वरुप ---
पालकाने आधी आपल्या मुला-मुलीची  उपक्रमानुसार  त्रिसरण पंचशिल व बुद्धवंदना  सुस्वर पठनाची तयारी करून घेणे. ज्यांची तयारी झाली अशांनी खालीलपैकी एका नंबरवर काॕल करणे. " विचारधारा चमू " आपल्याकडे येईल. या चमूसमक्ष त्रिसरण पंचशिल व बुद्धवंदना घेत असतांना मुला/मुलीचे निरिक्षण करण्यात येईल. व नोंद घेण्यात येईल.

कालावधी ---
 जुलै २०२० वर्षावास प्रारंभ पासून  ते सप्टेंबर २०२० वर्षावास समापन पर्यंत काॕल स्विकारले जातील. त्यानंतर Call स्विकारले जाणार नाही.
   
Call संपर्कासाठी ---Mobile no. ( 9011800490 )


            संस्कार वर्गाशी जुळून असलेल्या सर्व मुलांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.
   
     संयोजक
विचारधारा बालसंस्कार वर्ग
     धाम.रेल्वे.