१ जनवरी १८१८
महाराष्ट्र के बौद्ध और महार समूह हर वर्ष १ जनवरी को अपने पुरखो नमन करने भीमा कोरगांव जाते है यह दिन वे शौर्य दिवस के रूप में मनाते है।
डॉ॰ बाबासाहेब आंबेडकर भी हर साल १ जनवरी को भीमा कोरेगांव जाते थे।
भीमा कोरेगांवची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगांव या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. १ जानेवारी इ.स. १८१८ रोजी ही लढाई ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व मराठा सैनिकांत झाली होती. ब्रिटिशांतर्फे महारसैनिकांचे नेतृत्व ब्रिटिश व सेनापती कॅप्टन फ्रांसिस एफ. स्टाऊनटोन होता तर मराठा २८००० सैनिकांचे नेतृत्व पेशवे व सेनापती बाजीराव दुसरा हा करीत होता. तर दुसऱ्या बाजूला ५०० ते ८०० सैनिकांची सुसज्ज ब्रिटिशांतर्फे लढणारी तुकडी होती. पेशव्या राज्यात किंवा पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेने उच्चांक गाठला होता व त्याचाच एक प्रतिकार म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी त्यांच्याशी लढले होते असे मानले जाते. या युद्धानंतर महार - ब्रिटिश विजयी झाले आणि यामुळेच पेशवाई व मराठा साम्राज्याचाअस्त सुद्धा झाला. पेशव्यांनी प्रथम २००० सैनिकांची कुमक ब्रिटिश सैन्यांवर धाडली. व १२ तास चाललेल्या या लढाईत कँप्टन फ्रांन्सिस स्टाँटन याच्या नेतृत्वाखालील सैन्याने मराठा फौजेचा पराभव केला. कंपनी सैन्यातील बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री मधील प्रामुख्यानेमहार व दलित सैनिक समाविष्टीत होते आणि म्हणून दलित कार्यकर्ते दलित इतिहासात एक शौर्यांचे प्रतीक म्हणून या लढाईस मानले जाते.
भीमा कोरेगांवची लढाई
तिसरे इंग्रज-मराठा युद्ध ह्या युद्धाचा भाग
| दिनांक | १ जानेवारी, इ.स. १८१८ |
|---|---|
| स्थान | भीमा कोरेगांव, पुणे जिल्हा महाराष्ट्र |
| परिणती | ब्रिटिश व महारांचा विजय, पेशवे व मराठ्यांचा पराजय[१] |
| प्रादेशिक बदल | इंग्रज तुकडीचा कोरेगावच्या लढाईत यशस्वी बचाव बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री मधील प्रामुख्यानेमहार सैन्याच्या मदतीने |
| युद्धमान पक्ष | |
|---|---|
| सेनापती | |
| कॅप्टन फ्रांसिस एफ. स्टाऊनटोन | पेशवा बाजीराव दुसरा बापु गोखले आप्पा देसाई त्रिंबक डेंगळे |
| सैन्यबळ | |
| ८३४ (५०० पायदळ, ३०० घोडदळ आणि २४ तोफखाना) २६- तोफा) | २८,००० (२०,००० घोडदळ ८,००० पायदळ (जवळजवळ २००० सैनिकांनी सहभाग घेतला नेतृत्व २ तोफखाना प्रमूख) |
| बळी आणि नुकसान | |
| २७५ ठार, जखमी किंवा गहाळ | ५००–६०० ठार, जखमी किंवा गहाळ (ब्रिटिशांनुसार) |
इ.स. १८०० च्या दशकांत मराठा साम्राज्य अनेक तुकड्यात विभागलेले होते. त्यात पुण्याचे पेशवे, ग्वाल्हेर संस्थानचे शिंदे, इंदौरचे होळकर, बडोद्या चे गायकवाड आणिनागपूरचे भोसले असे तुकड्यामुळे कमकुवत साम्राज्य होते.[३] ब्रिटिश साम्राज्यने वरील साम्राज्याशी शांतता करार वा तह करून त्या त्या राजधानीचा भाग आपल्या साम्राज्याला जोडला होता. परंतु १३ जून इ.स. १८१७ रोजी पेशवे आणि गायकवाड घराण्यात महसूलावरून वाद झाला त्यात ब्रिटीशांची मध्यस्थी बाजीराव पेशवे यांनी घेतली. व मोठ्या प्रमाणात भाग पुणे साम्राज्यास जोडला. परंतु अप्रत्यक्षपणे तो भाग ब्रिटिशांनी आपल्या साम्राज्यास जोडला. व मराठा साम्राज्य ब्रिटीश अधिनस्त झाले आणि पेशवे केवळ नामधारी उरले.[४] [५] अल्पावधीतच पेशव्यांनी ब्रिटिशांना नमवण्याचा प्रयत्न खडकीची लढाई त केला परंतु ब्रिटिशांनी तेथेही पेशव्याचा पराभव केला. ही लढाई ५ नोव्हेंबर इ.स. १८१७ रोजी झाली.[६] त्यानंतर पेशवे तेथून सातारा येथे पळ काढला आणि पुण्यावर पूर्णपणे ब्रिटिशांनी ताबा मिळवला. पुणे हे चार्लस बार्टन बर व कर्नल जनरल स्मिथ याच्या नेतृत्वाखाली होते. आणि ते पेशव्यांचा पाठलाग करत होते. दरम्यान कर्नल स्मिथ याला भिती वाटत होती की पेशवा तेथूनही निसटून कोकणात जातील व तेथे राज्य करतील.म्हणून त्याने कर्नल बर याला कोकणात आणखी कुमक पाठवण्यास सांगितली. आणि एक जास्तीची कुमक पुण्याजवळील शिरूर येथे ठेवण्यास सांगितली.[७] दरम्यान पेशवे कर्नल स्मिथचा पाठलाग चूकवून निसटून जाण्यात यशस्वी झाले परंतु दक्षिणेकडून कर्नल थेओफिलस प्रिझलर सैन्यासह तयार होताच.,ते पाहून पेशव्यांने मार्ग बदलला आणि पूर्वेकडे चालत नाशिकच्या वायव्य भागातून पुढे सरकले आणि कर्नल स्मिथ त्यांच्यावर हल्ला करेल या भितीने ते पुन्हा पुण्याकडे वळले..[८]डिसेंबर इ.स. १८१७ च्या अखेरीस कर्नल बरला बातमी समजली की पेशवे पुण्यावर चालून येत आहेत तेव्हा त्याने शिरूर येथील सैन्याला मदतीसाठी तयार राहण्यास सांगितले ते सैन्य पुढे सरसावले आणि त्याची लढाई झाली हिच ती भिमा कोरेगावची लढाई होय.[९] [१०]
पेशवा तथा मराठा सैन्य[संपादन]
पेशव्यांच्या सैन्यात २०,००० घोडदळ, ८००० पायदळ व सुमारे सतत तैनात असे.[११] कंपनी सैन्यांनी हल्ला करू नये यासाठी प्रत्येकी ६०० सैनिकांच्या तीन तुकड्या तैनात असत.[१२] सैनिकांत अरब , गोसावी व मराठा (जात) असत. [१३]सदर सैन्यात जास्त संख्येने पहिल्या फळीत हल्ला करण्यासाठी अरब सैन्याचा वापर केला जात असे. तसेच ते भाडोत्री सैनिक व त्यांचे वारस यांचाही सैन्यात वापर केला जात असे.[१४], [१५] सैन्यात घोडदळ आणि तोफखाना असे दोन विभाग ठेवलेले असत.
लढाईचे नेतृत्व बापू गोखले, अप्पा देसाई आणि त्रिंबक डेंगळे हे करत असत. [१६]पैकी त्रिंबकजी डेंगळे हे कोरेगाव लढाईत प्रत्यक्ष सहभागी होते.[१७] तर अन्य जवळच्या फूलसेहर (आत्ताचे फुलगाव) येथे होते. सातारा गादीचे छत्रपती हे केवळ नामधारी व प्रतापसिंग हे देखील पेशव्यांबाजूने होते. [१८]
कंपनी सैन्य[संपादन]
- दुसऱ्या बटालीयन (बॉम्बे नेटीव्ह आर्मी तुकडी क्र १०२) मधील महार सुमारे ५०० सैनिक ज्यांचे नेतृत्व कँप्टन फ्रांन्सिस स्टाँटन यांनी केले. अन्य अधिकाऱ्यांमध्ये;
- लेप्टनंट आणि अड्जेटंट पीटसन
- लेफ्टनंट जॉन्स
- असिटंट सर्जन विंजेट
- सुमारे ३०० सैनिकांचे घोडदळ ज्यांचे नेतृत्व लेफ्टनंट स्वान्सटन यांनी केले.
- २४ युरोपियन आणि ४ स्थानिक मद्रासी तोफखाना (सहा पावडर तोफा) प्रमूख ज्यांचे नेतृत्व लेफ्टनंट चिसलोम(Chisholm), याच बरोबर सहायक सर्जन वायली (वायल्डे) यांचा तोफाखान्या समावेश होता.
तर पायदळातील सैनिक प्रामुख्याने महारहोते.
लढाई[संपादन]
भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी १८१८ - या दिवशी ब्रिटिश ईस्ट इंडीया कंपनीच्या कॅप्टन एफ.एफ. स्टाँटन यांच्या नेतृत्वाखालील दुसर्या बाँबे नेटिव्ह इन्फन्ट्री बटालियनच्या ५०० महार सैनिकांनी पेशवे सैन्याचा पराभव केला.
बाजीराव नासिककडे न जाता ओझरचा घाट उतरून जुन्नर खेडावरून ता. ३० डिसेंबर रोजी चाकण येथे येऊन पोहचला, अशी बातमी स्मिथ यास कळली. पूर्वी कोंकणांतून मुंबईकडून इंग्रज फौज येत होती तिला गाठावे किंवा पुण्यावर येऊन ते शहर एकदम हस्तगत करावे असा बाजीरावाचा बेत असल्याचें स्मिथ यास दिसून आले, दोन्ही गोष्टी इंग्रजांस बिकटच होत्या. पुण्यास इंग्रजांचा बंदोबस्त अगदींच तात्पुरता होता. त्याने आपल्या मदतीस शिरूरहून जास्त फौज बोलावली होती, त्यावरून कॅ. स्टाँटन थोडे इंग्रज सैन्य बरोबर घेऊन ता. ३१ डिसेंबर इ,स. १८१७ रोजी रात्री ८ वाजता शिरूरहून निघा, तो दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता कोरेगांवजवळ येऊन उतरला. तेथील टेकडीवरून त्याला पेशव्याची प्रचंड फौज भीमा नदीच्या काठीं दिसली. स्टाँटनची बातमी बापू गोखल्यास होतीच. घोडनदीहून वरील इंग्रज फौज पुण्यास येत होती तिची बाजीरावाशीं अकस्मात गाठ पडली. बापू गोखल्यास श्रीमंतानी आज्ञा केली, की आज लढाई करून आम्हास पुढे जाण्यास मार्ग करून द्यावा. गावास लहानशी तटबंदी होती तेथे इंग्रज आश्रयार्थ गेले. त्यावर दुसऱ्या बाजूने मराठ्यांनी तोफांचा मारा सुरु केला. जागा अडचणीची असल्यामुळे तोफा बंद करून मराठ्यांकडील आरबांनी व पायदळांनी इंग्रजांवर चालून घेतले. तेव्हा संगिनीचे व तरवारीचेच युद्ध झाले. इंग्रज शिकस्त झाले. त्यांचे पुष्कळसे ऑफिसर्स व लोक मारले गेले. रात्री ९ वाजेपर्यंत लढाई चालून पेशव्यांचे सैन्य आपल्या छावणीकडे परत आलें. इंग्रजांचे १७५ जखमी झाले, त्यापैकी बहुतेक होतकरूच होते. मराठ्यांचे सुमारे ५०० लोक पडले. थोडक्या लोकांनी पुष्कळांशी लढून आपला निभाव केल्याबद्दल कोरेगांव येथें इंग्रजांनी स्मारकाचा स्तंभ उभारला आहे. बाजीराव तर अगोदरच जेजुरीच्या वाटेने साताऱ्याकडे निघाला होता. पाठीमागून ज. स्मिथ येत असतां त्यास ओझरच्या घाटांत त्रिंबकजी डेंगळ्याच्या रामोशांनी इतके सतावून सोडले की ता. २ जानेवारी इ.स. १८१८ रोजी जेमतेम तो चाकणला येऊन पोंचला. त्याच दिवशी कॅ. स्टाँटन हा जखमी झालेले लोक व उरलेली फौज बरोबर घेऊन परत शिरूरच्या छावणीत गेला. [२१]